चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका केराची टोपली दाखवत असताना मोरसिंगभाई मित्रमंडळातर्फे शहरातील खड्डे बुजवून अनोखा उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे.
शहरात गेल्या वर्षापासून रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. तहसिल कार्यालय ते रेल्वे स्थानकापर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या कंबरतोड रस्त्यामुळे अनेकांना मनक्याचा आजार जडला आहेत. या रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे लिखित स्वरूपाची तक्रारी केल्या. मात्र नेहमीच नगरपालिकेकडून केराची टोपली दाखवली गेली. या समस्येला घेऊन चाळीसगावकर दिवसेंदिवस चिंताग्रस्त दिसून येत होता. दरम्यान हि गंभीर स्वरूपाची बाब भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंगभाई राठोड यांच्या लक्षात येताच. त्यांनी लागलीच मोरसिंगभाई मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांना याबाबत सांगून स्वखर्चाने मुरूमाचे ट्रॅक्टर बोलावून शहरातील विविध भागातील खड्डे बुजवण्याला सोमवारपासून सुरूवात केली आहेत.
तालुक्यात कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना केवळ चाळीसगावकरांंना खड्ड्यांच्या त्रासापासून वाचविण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याने याबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहेत. दरम्यान आंदोलन व निवेदन न देता मोरसिंगभाई राठोड मित्र मंडळांच्या वतीने प्रत्यक्षात खड्डे बुजवण्याला सुरूवात झाल्याने मोरसिंगभाई राठोड यांची प्रसंसा केली जात आहेत.
त्याचबरोबर चाळीसगाव शहरातील जनता आभार व्यक्त करत आहेत. सदर उपक्रम हे मोरसिंगभाई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली संभा आप्पा जाधव, रविभाऊ मोरे, गोरख राठोड, संजय राठोड, गंगाराम राठोड, मेघराज जाधव यांनी परिश्रम घेतले आहेत.