जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कंपनीतून कामानंतर मित्रासह दुचाकीने घरी जात असताना वळणावर दुचाकी स्लिप झाल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना झाल्याची घटना फाटा जवळ शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल राजेंद्र सपकाळे (वय-२१) रा. देव्हारी ता. जि. जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल राजेंद्र सपकाळे (वय-२१) हा तरुण आई वडील व मोठा भाऊ यांच्यासह जळगाव तालुक्यातील देव्हारी येथे वास्तव्याला आहे. तो एमआयडीसीतील सिद्धार्थ केमिकल कंपनीत वेल्डरमधून कामाला होता. शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी विशाल सपकाळे हा त्याचा मित्र विशाल गुळवे यांच्यासोबत दुचाकी (एमएच १९ – ५६१३) ने कंपनीतून देव्हारी येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. जळगाव तालुक्यातील उमाळे फाटाजवळ असलेल्या वळणावर त्यांची दुचाकी स्लिप झाली. यातील विशाल सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागी मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला विशाल गुळवे हा गंभीर जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मयत विशाल सपकाळेच्या पश्चात वडील राजेंद्र गोविंदा सपकाळे, आई मीराबाई मोठाभाऊ निखिल आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.