ट्रकची बसला जोरदार धडक; प्रवाशी किरकोळ जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिल्याने काही प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी १० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात रात्री साडे अकरा वाजता ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी ११७५) वरील चालक जब्बार शेख लुकमान शेख रा. सेंधवा जि. बडवाणी ( मध्यप्रदेश ) हा दारूच्या नशेत ट्रक चालवित होता. दारूच्या नशेत ट्रकचालवित असतांना समोरून येणारी बस क्रमांक (एमएच २० बीएल ३५५६) ला जोरदार धडक दिली. ही घटना रविवारी १० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात बसमधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री साडे अकरा वाजता बस चालक गोपाल मगन पाटील वय-४५ रा. सतखेडा ता.धरणगाव यांनी धरणगाव पोलीसात ट्रक चालकाविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालक जब्बार शेख लुकमान शेख रा. सेंधवा जि. बडवाणी ( मध्यप्रदेश ) याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.

Protected Content