नागपूर,लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याच्या बंगल्यावर वादळामुळे शेजारीच असलेले झाड कोसळले. यात जीवित हानी झालेली नाही.
राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होत नसून त्यात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. नागपूर येथील सिविल लाईन्स परिसरात माजी मंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या घरीच इडीकडून छापा टाकण्यात येऊन अटक करण्यात आली होती. गेल्या काही दिवसापूर्वी माजी मंत्री देशमुख यांनी मुंबई कारागृहात असून खांद्यावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयात दाखल होण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. पण ती न्यायालयाने फेटाळून लावत मुंबईतील जे.जे. रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश दिले होते.
माजी मंत्री अनिल देशमुख तुरुंगात असून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुटलेला नाही त्यातच आज दुपारच्या सुमारास नागपूर परिसरात देशमुख यांच्या निवासस्थानावर जवळच असलेले झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले. यात बंगल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सीसीटीव्हीचे नुकसान झाले आहे. शिवाय भिंतीना तडे गेले आहेत.