जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळहुन नाशिककडे जाणारी भुसावळ-देवलाली शटल ही गाडी जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बुधवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता उभी असताना डब्याच्या बॅटरी पॅनलला अचानक आग लागली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच धावपळ उडाली.
अधिक माहिती अशी की, भुसावळ येथून नाशिककडे जाणारी भुसावळ देवलाली पॅसेंजर रेल्वे गाडी बुधवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवरीलप्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आली. गाडी उभे असताना एका डब्यातील बॅटरी पॅनल मधून धूर येत असल्याचे काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. यावेळी प्रवाशांनी डब्यातून बाहेर पडत संपूर्ण बोगी खाली केली. यानंतर प्रवाशांनी ही बाब आरपीएफ कर्मचाऱ्यांना सांगितले असता आरपीएफ कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत तांत्रिक कर्मचाऱ्यांना पाचारण केले. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी या ही आग विझवून बॅटरी पॅनलची दुरुस्ती केली.
डब्यात आग लागल्याचे समजतात प्रवाशांनी डब्यातून बाहेर उतरत संपूर्ण डबा खाली केला. रेल्वेला आग लागल्याची बातमी कळताच प्रवाशांची एकच धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आरपीएफ कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला आहे.