जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर येथे पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर पकडले आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामानंद नगर येथे गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता पोलिसांची गस्त होती. त्यावेळी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ सीव्ही ४०६) आणि विना क्रमांकाच्या ट्रॉलीमध्ये वाळू वाहतूक करताना आढळून आले. दरम्यान पोलिसांनी वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नव्हता. दरम्यान पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांच्या फिर्यादीवरून रमेश महादू गोपाळ (वय-२७) रा. पारस नगर आणि ज्ञानेश्वर सदाशिव मुलमुले (वय-२८) रा. पार्वती नगर जळगाव या दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक देवानंद साळुंखे करीत आहेत.