चिंचोली फाटा येथे साप चावल्याने एका चिमुकलीचा मृत्यू

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक जिल्हयात सर्पदंशामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमावावा लागला. खेळता असताना तिला स्पर्शदंश झाला होता. सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. नाशिक तालुक्यातील चिंचोली फाटा मोहोगाव शिवार येथे ही घटना घडली. मात्र, डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे सहा वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सिन्नर येथील सहा वर्षाची मुलगी ही सुट्ट्यांमध्ये चिंचोली फाटा येथे आजी बाबांकडे आली होती. खेळता खेळता सकाळी 11 वाजेच्या सुमारास तिला स्पर्शदंश झाल्याने अस्वस्थ वाटायला लागलं. त्यानंतर तिचे आजोबा रामकृष्ण भिसे यांनी औषध उपचारासाठी तिला शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. यावेळी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून तिला तपासण्यासाठी विलंब करण्यात आला.

यानंतर त्यांनी दोन ते तीन गोळ्या देऊन तिला घरी जाण्यास सांगितले. मात्र घरी गेल्यानंतर तिला जास्त त्रास होऊ लागला आणि तिला नाशिकच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केलं, असे नातेवाईकांनी सांगितलं आहे. शिंदे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आई आणि आजोबांनी केला आहे.

Protected Content