यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या भाजपा उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा येथील धनश्री चित्रमंदिरात बुधवारी सायंकाळी पार पडला. या मेळाव्याला प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भारतीय जनता पक्षाचे पुर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदुभाऊ महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चा्ैधरी, शरद महाजन, कृषी बाजार समिती सभापती हर्षल पाटील, मीना तडवी, शिवसेना शिंदे गटाचे राजु काठोके, नितीन सोनार, मनसेचे चेतन अढळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मेळाव्यात प्रमुख पाहुण्यांसह लोकसभा उमेदवार रक्षा खडसे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना योग्य नियोजनासह देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले. मेळाव्यास तालुक्यातील महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले.
महा मेळाव्यास महायुतीची सर्व घटक पक्षाची पदाधिकारी उपस्थित असताना व्यासपीठावर अजित पवार गटाची राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यांना पाचारण करण्यात आले नसल्याने अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष रितेश पाटील व कार्याध्यक्ष जीतेंद्र सोनवणे व आदी पदाधिकारी मेळाव्यातुन निघून गेले असल्याचे पदाधिका-यांनी सांगितले.