जळगाव प्रतिनिधी । डॉ.अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान आणि ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सानेगुरुजी कथामाला व व्याख्यानमालेचे उद्घाटन साने गुरुजी जयंती निमित्त करण्यात आले.
यावेळी शिक्षणशास्त्र विभागाचे माजी प्राचार्य डॉ.प्रभाकर चौधरी, शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे, चंद्रकांत भंडारी आदींच्या हस्ते पूज्य साने गुरुजी, गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील, ए.टी. झांबरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रसंगी डॉ.प्रभाकर चौधरी यांनी भिकम भटाच्या सुंदर गोष्टीने कथामालेला सुरुवात करण्यात आली. सदर कथामालेत दर महिन्याच्या 24 तारखेला साने गुरुजींनी एक कथा विद्यार्थ्यांना सांगितली जाणार आहे .सदर कथामाला ही वर्षभर चालणार असून विद्यार्थ्यांना सानेगुरुजींची संपूर्ण माहिती या कथामालेतून होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.बी.कोळी यांनी केले प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दिलीपकुमार चौधरी, रेखा पाटील, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.