जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीतील दुकानात सामान घेण्यासाठी आलेल्या तरूणाने दुकानातील गल्ल्यातून ४ हजाराची रोकड लांबविली होती. या गुन्ह्यातील संशयित कृष्णा चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, “शहरातील सुप्रिम कॉलनी विठ्ठल मंदिर चौकात अशोक सुभाष शिंदे (वय-२८) हा तरुण किराणा दुकान चालवून उदनिर्वाह करीत होते. बुधवार, दि. २७ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अशोक यांचा भाऊ विकास हे दुकानात होते. यावेळी ते घरात पाणी पिण्यासाठी गेले असता सामान घेण्यासाठी आलेला ग्राहक तालुक्यातील रायपूर येथील कृष्णा चव्हाण यांनी दुकानाच्या गल्ल्यातून ४ हजारांची रोकड लांबविली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी आज गुरूवारी २८ जुलै दुपारी ३ वाजता रोजी कृष्णा चव्हाण याला अटक करण्यात केली असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.