कॅफेला लागली अचानक आग; साहित्य जळून खाक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात एकीकडे थंडी वाढत असतांना दुसरीकडे जळगावातील एका कॅफेला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत सर्व साहित्य जळून खाक झालीत. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाद्वारे ही आग विझविण्यात आली.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील एम.जे.महाविद्यालय परिसरातील मुख्य चौकातील विठ्ठल मंदिरासमोर एस.जे.इ.पाणीपुरी व कॅफेचे दुकान सचिन सपकाळे यांचे दुकानाला रात्री सुमारास अचानक आग लागल्याने मनपाचे अग्निशमन विभागाचे बंबला पाचारण करण्यात आला होते.

यावेळी तात्काळ घटनास्थळी अग्निशमन विभागाचे बंब पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यावेळी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानात असलेले ४ लहान सिलेंडर तर १ मोठे सिलेंडर बाहेर काढण्यात यशस्वी झाले. यादी सुचदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दुकानाचे मोठे नुकसान झाले आहेत.

Protected Content