जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या वादातून मध्यरात्री महिलेच्या घरात प्रवेश करत शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून स्टीलचा रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री पिंप्राळा हुडको परिसरात घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेहरून्नीसा शेख कय्युब वय ३२ ही महिला आपल्या परिवारासह पिंप्राळा हुडको परिसरात वास्तव्याला आहे. गुरूवारी २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजता महिला ही घरात झोपलेली असतांना जुन्या वादातून चार जणांनी महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत त्यांना शिवीगाळ करत डोक्यात स्टिलचा दांडा टाकून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर महिलेला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर सोमवारी २ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी नुर मोहंमद, फरीद पटेल, अंजूमबी फिरोज खान, अहमद नुर सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.