जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजपूत समाजाचे युवा नेतृत्व अभियंता दिपकसिंग राजपूत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना राजपूत समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा विषय लवकरच मार्गी लाऊ असे आश्वासन देखील दिले. यावेळी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, जलगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादाजी भुसे, आमदार चंद्रकांत पाटील, जळगाव लोकसभेच्या अधिकृत उमेदवार स्मिता वाघ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या आहे मागण्या
राजपूत समाजाचे जात प्रमाणपत्र सुरळीत पद्धतिने देण्यात यावे. यावल तालुक्यातील शेळगाव बॅरेज प्रकल्पाला हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जलाशय असे नाव द्यावे. राजपूत समाजाचे आर्थिक महामंडळ स्थापन करावे. राजपूत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावे. राजपूत समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता भामटा शब्द काढून टाकावा. समाजाच्या न्याय मागण्यासाठी व जनहितार्थ केलेल्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावा. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती राज्यात ९ मे रोजी जन्म तारखेनुसार साजरी करण्यात यावी व या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. अश्या मागण्या केल्या आहेत.