Home Cities अमळनेर महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अमळनेरातील डॉक्टराचे निवेदन

महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अमळनेरातील डॉक्टराचे निवेदन


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पश्चिम बंगाल मधील कोलकता येथे एका महिला डॉक्टरवर काही नराधमांनी अत्याचार करुन त्या महिला डॉक्टरचा निर्घृण खून केल्याची निंदनीय घटना घडली आहे.

ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असुन या घटनेतील नराधमांना तात्काळ फासावर लटकवण्यात यावे या प्रकरणातील सर्व आरोर्पीना लवकरात लवकर पकडून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहोत.

डॉक्टरांना हॉस्पीटल मध्ये काम करतांना कुठलीही भिती वाटली नाही पाहिजे या पध्दतीचे कठोर कायदे शासनाने आणावेत व देशातील सर्वच डॉक्टर महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाय योजना कठोर करण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन १७ ऑगस्ट रोजी तालुक्यातील डॉक्टर्सतर्फे अमळनेर उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदन देते वेळी तालूक्यातील सर्व डॉक्टर उपस्थित होते.


Protected Content

Play sound