Home क्राईम भरधाव डंपरची पिकअप वाहनाला जोरदार धडक

भरधाव डंपरची पिकअप वाहनाला जोरदार धडक


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौक ते ईच्छादेवी चौक दरम्यान असलेल्या विशाल पेट्रोलपंप समोरील राष्ट्रीय महामार्गावर पाळधीकडून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात डंपरवरील चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डंपर क्रमांक (एमएच १६ डीपी ११६५) हा पाळधीकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जात असतांना ईच्छादेवी चौक ते अजिंठा चौक दरम्यानच्या विशाल पेट्रोल पंपाजवळ पुढे जात असलेले टाटा कंपनीची वाहन क्रमांक (एमएच १९ सी ०००२) ने जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत टाटा वाहनावरील चालक योगेश प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक ज्ञानदेव दादा केदळे रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound