Home क्राईम भरधाव क्रेनने उडविले; मालवाहू रिक्षाचालकाचा दुदैवी मृत्यू !

भरधाव क्रेनने उडविले; मालवाहू रिक्षाचालकाचा दुदैवी मृत्यू !

0
141

वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील चायला हॉटेलजवळ भरधाव क्रेनने दिलेल्या धडकेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात क्रेन घेवून जाणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अशपाक शेख अहमद अब्दुल तसब्बुफ वय ४६ रा. अक्सा नगर जळगाव असे मयत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अक्सा नगरात शेख शपाक शेख अहमद हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. मालवाहू रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते. भुसावळ तालुक्यातील वरणगाव राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चायला हाटेलजवळून शेख अशपाक हे रविवारी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मालवाहू रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीडब्ल्यू ६८१२) मध्ये नारळ भरून मुक्ताईनगरकडून वरणगावकडे जात होते. त्यावेळी रॉग साईडने येणारा क्रेन वाहन क्रमांक (एमपी ११ युएच १११९) ने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात शेख अशपाक अहमद अब्दुल यांचा दुदैवी मृत्यू झाला तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनाम केला. याबाबत दुपारी २ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल हे करीत आहे.


Protected Content

Play sound