अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सालाबादप्रमाणे 6 जानेवारी रोजी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेतर्फे अमळनेरात पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला असून अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळील योगा भुवनात बाळशास्त्री जांभकरांचे प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे.
आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 6 जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जात असतो.अमळनेर येथे आजी माजी आमदार आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा पत्रकार दिन सोहळा पार पडणार आहे.यावेळी काही मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.
सकाळी ठीक 10 वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार असून सदर प्रसंगी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आवर्जून उपस्थिती द्यावी तसेच मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी येताना मान्यवरांनी भेट वस्तू व हार गुच्छ आणू नये असे विनम्र आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष आर. जे. पाटील व सचिव जितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.