जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील बळीरामपेठ येथील स्टेशनरी दुकानदाराला कचरा फेकण्याच्या कारणावरून तीन ते जणांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना उघडकीला आला आहे. याप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप जयंतीलाल जैन (वय-३८) रा. बळीराम पेठ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे स्टेशनरी दुकान आहे. शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दिलीप जैन हे दुकानात असतांना कचरा फेकण्यावरून दोन ते तीन जणांमध्ये वाद झाला. त्यानंतर अज्ञात दोन ते तीन जणांनी दुकानदार दिलीप जैन यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर पत्नी टिना जैन, आई कमलाबाई जैन आणि फिर्यादीचा महेश परदेशी यांना देखील मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर दिलीप जैन यांनी धाव घेतली. शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.