ओसरत्या कोरोनाचा जिल्ह्याला दिलासा; आज ५२१ बाधित रूग्ण आढळले !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ५२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ६६५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज दिवसभरात ११ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आजची आकडेवारी

जळगाव शहर- ५१, जळगाव ग्रामीण- १३, भुसावळ, ५१, अमळनेर-४, चोपडा-५४, पाचोरा-३, भडगाव-२, धरणगाव-१४, यावल-३७, एरंडोल-१९, जामनेर-७०, रावेर-५०, पारोळा-१५, चाळीसगाव-७०, मुक्ताईनगर-४४, बोदवड-१५ आणि इतर जिल्ह्यातील ९ असे एकुण ५२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

 

जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ३६ हजार २८५ रूग्ण बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख २४ हजार ३४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित ९ हजार ५०१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात ११ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content