सावदा येथे उद्या रावेर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा

bjp

फैजपूर प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रावेर विधानसभा क्षेत्रातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या दि.17 सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जेहरा मंगल कार्यालय सावदा येथे आयोजित करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ना. हरिभाऊ जावळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण, कृषी विस्तार व संशोधन परिषद पुणे यांच्या कार्याचा वृत्तांत बांधिलकी पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या मेळाव्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य माजी महसूलमंत्री ना.एकनाथराव खडसे, नामदार लोकनेते हरिभाऊ जावळे, आमदार रावेर विधानसभा मतदारसंघ खासदार रक्षाताई खडसे, रावेर लोकसभा अशोक कांडेलकर, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी राजेंद्र जी फडके, राष्ट्रीय संयोजक ‘बेटी बचाव बेटी पढाव’ किशोर काळकर, संघटन मंत्री उत्तर महाराष्ट्र संजय पाटील, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी या मेळाव्यास शक्ती केंद्रप्रमुख, शाखाध्यक्ष, बूथ प्रमुख, बुथ समिती, पेज प्रमुख गण, प्रमुख, गटप्रमुख, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आघाड्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस व बंधू भगिनींनी उपस्थित अशी विनंती सुनिल पाटील भा.ज.पा.ता.अध्यक्ष रावेर, वासुदेव नरवाडे भा.ज.पा.ता.सरचिटणीस रावेर, महेश चौधरी भा.ज.पा.ता.सरचिटणीस रावेर, डाँ नरेंद्र कोल्हे भा.ज.पा.ता.अध्यक्ष यावल, उज्जैनसिंग राजपुत भा.ज.पा.ता.सरचिटणीस यावल, विलास चौधरी भा.ज.पा ता.सरचिटणीस यावल यांनी केली आहे.

Protected Content