भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील प्रभाग क्र. १३ मध्ये आज (दि.१८) सकाळी येथील विधानसभा क्षेत्राचे भाजप, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती संघटना या महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ फेटे बांधुन भव्य प्रचार रॅली काढण्यात आली.
यावेळी प्रभागातील कार्यकर्ते, जेष्ठ नागरिकांतर्फे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅलीत प्रमोद सावकारे, रामदास सावकारे, नगरसेवक राजेंद्र दत्तु आवटे, युवराज लोणारी, मनोज बियाणी, मुकेश गुंजाळ, अमोल इंगळे, राजेंद्र नाटकर, पिंटू कोठारी, गुड्डू अग्रवाल, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.