फैजपूर (प्रतिनिधी) येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय व म्युनिसिपल हायस्कूलमधील राष्ट्रीय छात्र सेनेचेच्या विद्यमाने फैजपुर शहरात ‘हागणदारी मुक्त परिसर’ हे ब्रीद घेऊन जनजागृती रॅलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान भारत सरकार पुरस्कृत स्वच्छता पंधरवडा निमित्ताने ‘क्लीन इंडिया’ ही थीम घेऊन डी जी एन सी सी, दिल्ली यांच्या आदेशान्वये 18 महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल सत्यशिल बाबर, प्रशासकीय अधिकारी मेजर सुशील कुमार, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.पी.आर. चौधरी आणि म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक आर.एल. आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी प्रा.लेफ्ट राजेंद्र राजपूत व चिफ ऑफिसर एस.एम. राजपूत यांनी या रॅलीचे यशस्वी आयोजन केले. यात 48 एस डी कॅडेट्स 15 जे डी कडेट्स यासोबत 75 इतर लोकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या रॅलीची सुरुवात म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर येथून झाली. तर सुभाष चौक, खुशाल भाऊ रोड, पेहेड वाडा, मोठा मारुती मंदिर चौक असा मार्गातून गेली. या मार्गावर ठिकठिकाणी एनसीसी कडेट्सने हागणदारी मुक्त परिसर या विषयावर पथनाट्य सादर केले. या रॅलीच्या माध्यमातून एनसीसी कॅडेट्सनी लोकांना विनंती केली की, आपण जसे आपला घर आणि परिसर स्वच्छ ठेवतो. तसाच आपल्या शहराचा आणि गावाचा परिसर सुद्धा स्वच्छ राखावा. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, चिफ ऑफिसर एस एम राजपूत, संजय बाऱ्हे, सुधीर पाटील, तोसिफ तडवी, दुर्गेश महाजन, तुषार मोरे, महेंद्र महाजन, आशराज गाढे, शेखर भालेराव आदींनी मार्गदर्शन व सहकार्य केले.