एरंडोल प्रतिनिधी । येथील म्हसावद नाक्यावरील काशी हॉटेल समोरील नगरपालिकेचा हाय मास्ट विजेचा खांब संध्याकाळी झालेल्या वादळात अचानक कोसळला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
यावेळी सदर खांब हा काशी हॉटेल व शेजारीच असलेल्या चहा च्या दुकानाच्या मधोमध पडला. लॉक डाऊन असल्याने याठिकाणी कोणीही नागरीक नव्हते त्यामुळे मोठी हानी टळली असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. सदर विजेचा खांब हा एरंडोल नगर पालिकेचा आहे व तो वरच्या बाजूला कुजलेला होता. या घटनेमुळे शहरातील हाय मस्ट विजेचे खांब नगर पालिकेने व्यवस्थित तपासून त्यांचे नुतनीकरण करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.