चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील अंधशाळेजवळ घराचे बांधकामावरून झालेल्या वादातून एका बांधकाम व्यवसायिकाला दोन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी ८ जून रोजी सायंकाळी ८ वाजता घडला आहे. याप्रकरणी रविवारी ९ जून रोजी दुपारी साडेबारा वाजता मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, चाळीसगाव शहरातील अंधशाळेजवळ भारत सुकलाल चौधरी वय ५५ हे वास्तव्याला आहे. दरम्यान घराच्या बांधकाच्या कारणावरून झालेल्या वादातून भारत चौधरी यांना घराजवळ राहणारे पृथ्वीराज सुकलाल चौधरी व प्रतिक सुकलाल चौधरी यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून दुखापत केली. तसेच त्यांना शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीसात भारत चौधरी यांनी तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ९ जून रोजी दुपारी १२.३० वाजता मारहाण करणारे पृथ्वीराज सुकलाल चौधरी व प्रतिक सुकलाल चौधरी दोन्ही रा. अंधशाळेजवळ, चाळीसगाव यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाटील हे करीत आहे.