Home क्राईम किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण

किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील राजपाल नगरात कंपाऊंडमध्ये रात्रीच्या वेळी का आले याचा जाब विचारण्याचा कारणावरून एकाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने डोक्याला, हातापायाला मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना गुरूवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बलवंत मंगीपुरा चव्हाण वय-४५, रा. राजपाल नगर, शिरसोली हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गुरुवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांनी त्यांच्या शेजारी राहणारे गणेश बापू महाजन आणि योगेश बापू महाजन यांना आमच्या कंपनीमध्ये रात्री का आले होते, असा विचारणा केली. याचा राग आल्याने गणेश बापू महाजन, योगेश बापू महाजन, आशाबाई बापू महाजन, रोहिणी गणेश महाजन सर्व रा. राजपाल नगर शिरसोली यांनी बलवंत चव्हाण यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने डोक्याला, हाताला, पायाला मारून गंभीर दुखापत केली. तसेच तू जर आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर जखमी बलवंत चव्हाण यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता मारहाण करणारे गणेश बापू महाजन, योगेश बापू महाजन, आशाबाई बापू महाजन, रोहिणी गणेश महाजन तिघे सर्व रा. राजपाल नगर, शिरसोली यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल समाधान टहाकडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound