दारूसाठी पैसे न दिल्याने घरात घुसून एकाला मारहाण

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील कोळीवाडा परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाला घरात घुसून बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सतीश गुलाबराव पाटील वय- 41, रा.कोळीवाडा भुसावळ हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्या परिसरात नरेश रमेश सोनवणे हा तरुण देखील राहतो. रविवारी 26 मे रोजी दुपारी 2 वाजता नरेश सोनवणे हा सतीश पाटील यांच्याकडे आला. त्याने दारूसाठी पैसे मागितले, त्यावर सतीश पाटील यांनी पैसे दिले नाही, याचा राग आल्याने नरेश रमेश सोनवणे तसेच त्याची आई आणि त्याची पत्नी या तिघांनी सतीश पाटील यांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण करून जखमी केले. दरम्यान या प्रकरणी सतीश पाटील यांनी सोमवारी 27 मे रोजी दुपारी 3 वाजता पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल सय्यद करीत आहे.

Protected Content