बेंडाळे महाविद्यालयात ‘स्टार्टअप व परदेशातील शिक्षणाच्या संधी’ या विषयावर एक दिवशीय चर्चासत्र

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय तसेच ‘गर्जे मराठी’ सामाजिक संस्था कॅलिफोर्निया ( अमेरिका ) आणि लेवा भातृमंडळ- पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप व परदेशातील शिक्षणाच्या संधी’ या विषयावर एक दिवशीय चर्चासत्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे स्थायिक झालेले महाराष्ट्रीन लोकांनी मराठी तरुणांसाठी ‘गर्जे मराठी’ ही सामाजिक संस्था स्थापण करण्यात आली आहे. याच संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद गानू हे प्रमुख वक्ते म्हणून म्हणून या चर्चासत्रात उपस्थित होते.

डॉ. गानू यांनी सांगितले की, भारतात ग्रामीण भागात खूप सारे संसाधने व नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत, त्यांना योग्य ते स्वरूप दिल्यास मोठया उद्योग व्यवसायात ते रूपांतरित होऊ शकतात. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे व महिलांचे लहान गट तयार करून आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना मांडल्यास ‘गर्जे मराठी’ ही संस्था सर्वतोपरी मोफत मार्गदर्शन करेल अशी ग्वाही डॉ गानू यांनी यावेळी दिली.

खान्देशात केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. केळीवर प्रक्रिया करून मोठे उदयोग ही उभे करता येऊ शकतात , भारतात गुणवत्ता पूर्वक अन्न प्रक्रिया उद्योगांना देखील मोठी संधी आहे. तसेच जपानी भाषा लिहिता वाचता येणाऱ्या तरुणांना परदेशात रोजगारात संधी आहेत .भारतीय माणूस हा जगात प्रामाणिक काम करणारा व्यक्ती म्हणून गौरवाने नाव घेतले जाते, असंही डॉ. गानू यांनी सांगितले.

या चर्चासत्रात पुण्याच्या फेलिक्स आयटीचे संचालक विकास वारके, लेवा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड असोसिएशन चे रवींद्र चौधरी व नितीन इंगळे, लेवा भ्रातृमंडळाचे अध्यक्ष पृषोत्तम पिंपळे, सचिव कृष्णाजी खडसे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे, उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे, डॉ स्मिता चौधरी, यांच्यासह व्ही.बी कोलते कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग -मलकापूर, भालोद महाविद्यालय, जी. जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर, गोदावरी इंजिनीयरिंग कॉलेज- जळगाव, कॉलेज ऑफ फार्मसी- साकेगाव , डॉ उल्हास पाटील कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चरचे शिक्षक व विद्यार्थी या चर्चासत्रात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आर. जी. बावने यांनी केले.

 

 

Protected Content