पूरग्रस्तांच्या मदतीचाच्या पाकिटांवर सरकारकडून जाहिरातीचा किळसवाणा प्रकार

 

jahirat

 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही शासनाने जाहिरातबाजीचा किळसवाण्या प्रकारावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात टीका होतेय.

सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर लावण्यात आले आहेत. या स्टीकरवर स्थानिक पुढारी समिर शिंगटे आणि सुधाकर भोसले यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आलीय. सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदतीवरुन सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेटीझन्सकडून सरकारला धारेवर धरले जात असून स्वत:चं कर्तव्य बजावतानाही जाहिरातबाजी करता का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच, काही नेटीझन्सने फेसबुकवरुन हे फोटो शेअर करताना, सरकारला परिस्थितीचे गांभिर्य नसल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्याही कपाळावर महाराष्ट्र सरकारतर्फे असे का लिहित नाही? असा प्रश्न विचारला आहे.

Protected Content