जळगाव प्रतिनिधी | भाजीपाला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा वरच्या खिशातून मोबाईल चोरून नेल्याची घटना काल सायंकाळी महाराणा प्रताप पुतळ्या जवळ घडलीय. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, विठ्ठलसिंग देवराम मोरे (वय 40, रा. वाघनगर मुंदडा हिल) हे काल सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास महाराणा पुतळ्याजवळ भाजीपाला घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या वरच्या खिशातील अठरा हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.