Home क्राईम शिरसोली येथील बेपत्ता झालेल्या प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

शिरसोली येथील बेपत्ता झालेल्या प्रौढाचा पाण्यात बुडून मृत्यू

0
37

जळगाव प्रतिनिधी । गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय प्रौढाचा  आज सोमवारी गावातच शिरसोली प्र .न . आणि प्र.बो. या दोन गावांना जोडणार्‍या पुला जवळील नदीच्या सांडपाण्यात मृतदेह आढळून आला आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र .बो. येथील बंडू उर्फ मधुकर लक्ष्मण बुंधे (बारी) वय ४५ हे २ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर कुणालाही न सांगता घरातून निघून गेले.  गावात तसेच नातेवाईकांकडे विचारपूस केली असता तो मिळून न आल्याने बंडू बुंधे यांचे लहान बंधू विकास बुंधे यांनी ४ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. आज सायंकाळी गावातील पुरूष शौचालयासाठी गेला असता, त्याला दोन्ही गावांना जोडणार्‍या पुला जवळील सांडपाण्यात मृतदेह तरंगतांना दिसून आला. त्याने ही माहिती गावातील पोलीस पाटील यांना दिली. पोलिसा पाटलांनी हा प्रकार एमआयडीसी पोलिसांना कळविला यानंतर मृतदेहाची ओळख पटविली असता, ते गावातीलच बंडू बुंधे असल्याचे समोर आले. ओळख पटल्यानंतर  मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. नेमका बुंधे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा गावातच मृतदेह आढळून आल्याने तर्कविर्तकांना उधाण आले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

 


Protected Content

Play sound