जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधिका समोर जुन्या भांडणाच्या वादातून १७ वर्षीय मुलाला चार जणांनी शिवीगाळ करून तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना १५ रोजी मार्च रोजी दुपारी घडली. रात्री उशीरा जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहन शालीक बाविस्कर (वय-१७) रा. हनुमान मंदीर, तुकाराम वाडी जळगाव. हा कामाच्या निमित्ताने १५ मार्च रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधिका समोरील रोडवरून जात असतांना पियुष मुकुंदा ठाकूर, हर्षल गजानन ठाकुर, खुशाल मुकुंदा ठाकुर, मुकुंदा ठाकुर रा. जळगाव यांनी मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. तर यातील हर्षल ठाकुर याने कंबरेतील चाकू काढून रोहन बावीस्कर याच्यावर हल्ला चढवत डाव्या हातावर वार केले. तर इतरांनी सोडू नका असे बोलून दम दिला. यात रोहन गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रात्री उशीरा तालुका पोलीसांनी जबाब नोंदविला. रोहन बाविस्कर यांच्या जबाबावरून तालुका पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशील पाटील करीत आहे.