भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला दुचाकीवर बसवून जंगलात नेवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यातील संशयिताला अटक करण्यात आली असून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतरा वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गेल्या दोन वर्षापासून अक्षय उर्फ राजेश ज्ञानबा उर्फ दिलीप बनसोड हा पिडीत मुलीचा पाठलाग करत होता. दरम्यान, २१ जूलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिडीतेला गोड बोलून तिला तिच्या काकांबद्दल सांगायचे आहे व त्याचे मोबाईलमध्ये काय आहे ते दाखवायचे आहे असे सांगितले. आपण थोडे पुढे जावू असे सांगून पिडीतेला दुचाकीवर बसवून पिंप्रीसेकम शिवारातील जंगलात नेले. तिथे तिला मारहाण करून बळजबरी अत्याचार केला. दरम्यान याप्रकरणी पिडीतेने भुसावळ ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अक्षय उर्फ राजेश ज्ञानबा उर्फ दिलीप बनसोड रा. भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि प्रकाश वानखेडे करीत आहे.