Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना रविवारी समोर आली आहे. या संदर्भात सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवार ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, परंतु तिच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound