जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील दापोरा गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी १७ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस अज्ञात व्यक्तिविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील दापोरा गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान १४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता पीडित मुलगी ही घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत आम्ही फूस लावून पळवून नेले आहे. दरम्यान पीडित मुलीच्या नातेवाईकांनी बुधवारी १७ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता जळगाव तालुका पोलिसात १० घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.