जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील अल्पवयीन १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जळगाव तालुक्यातील आसोदा गावातून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना शुक्रवारी ३१ मे रोजी दुपारी १२ वाजता मुलीला झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी १ जून रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील अल्पवयीन १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही नातेवाईकांसह कामाच्या निमित्ताने जळगाव तालुक्यातील असोदा गावात आलेल्या होत्या. महिनाभर काम केल्यानंतर शुक्रवारी ३१ मे रोजी दुपारी १२ वाजता मुलगी ही पुन्हा भोकरदन येथे जाण्यासाठी निघाली असता अज्ञात व्यक्तीने आसोदा गावातून तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही घटना घडल्यानंतर तिच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शनिवारी १ जून रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर हे करीत आहे.