जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील निमगाव येथून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील निमगाव येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता मुलगी ही सकाळी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली. त्याच्यानंतर ती रात्रीपर्यंत घरी आली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्या बाबत कुठेही माहिती मिळाली नाही.
त्यामुळे तिच्या पालकांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. यात अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार हरीश पाटील हे करीत आहे.