Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
36

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात राहणारे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २१ एप्रिल रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी सचिन माळी याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सचिन माळी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.

 


Protected Content

Play sound