जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका परिसरातून एका अल्पवयीन मुलीला एकान फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयी मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते.  १४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास विजय (पुर्ण नाव माहिती नाही) या तरूणाने अज्ञातपणाचा फायदा घेवून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी पीडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.

 

 

 

Protected Content