वरणगावातून अल्पवयीन मुलीला पळविले

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एकाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, वरणगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावात राहणारा सोमन मधुकर जयकर याने १७ सप्टेंबर रोजी फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांना तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती कुठेही मिळाली नाही. तसेच शहरातील सोमन जयकर देखील गावात नसल्याने मुलीच्या नातेवाईकांना त्यांच्यावर संशय बळावत त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशूराम दळवी करीत आहे.

 

Protected Content