यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घडना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील मनवेल येथे राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलगी घरी असतांना फुस लावून पळवून नेल्याचे उघडकीला आला. मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली परंतू आढळून आली नाही. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.