धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरूणाचा मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली रेल्वे स्टेशनजवळ एका परप्रांतीय व्यक्तीचे धावत्या रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुनिलकुमार पलटन पासवान वय ४५ रा. रहिमपुरा, मुजलफ्फरपूर बिहार असे मयत झालेल्या परप्रांतीय व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रेल्वे पोलीस स्टेशनजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४१२च्या २२ जवळ धावत्या रेल्वेतून सुनिलकुमार पासवान हा परप्रांतीय तरूण रेल्वेतून प्रवास करत असतांना मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता धावत्या रेल्वेतून पडला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुका पोलीसांना मिळाली, त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे मयताची ओळख पटली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content