Home क्राईम वृध्द महिलेच्या गळ्यातून धुमस्टाईल मंगळसुत्र व चैन लांबविली !

वृध्द महिलेच्या गळ्यातून धुमस्टाईल मंगळसुत्र व चैन लांबविली !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रीकृष्ण कॉलनीत राहणाऱ्या एका वृध्द महिलेजवळून अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र आणि सोन्याची चैन असा एकुण ९५ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील श्रीकृष्ण नगरात सुनंदा सुधीर महाजन वय ६५ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. सोमवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वृध्द महिला आपल्या घरी असतांना अज्ञात दोन चोरटे त्यांच्याजवळ आले आणि अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत आणि सोन्याचे चैन जबरी हिसकावून चोरू नेल्याची घटना घडली. यावेळी वृध्द महिलेने आरडाओरड केली परंतू तोपर्यंत चोरटे घटनास्थळाहून पसार झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.


Protected Content

Play sound