जळगाव प्रतिनिधी । महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षाची कारावासाची आणि दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारी २४ वर्षीय महिलेचा ६ मार्च २०१८ रोजी गावातील आरोपी आबा जगण पाटील याने महिला घरात एकटी असतांना घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात न्यायालयाने चार साक्षीदार तपासले यात पिडीत महिलेची साक्ष महत्वाची ठरली. न्याशधीर डी.एन. खडसे यांनी आरोपीला दोषी ठरवत भादवी कलम ३५४ प्रमाणे ५ वर्ष शिक्षा व ५ हजार रूपये दंड, ३५४-अ प्रमाणे ३ हजार रूपये दंड, ३५४-ब प्रमाणे ३ वर्ष शिक्षा व २ हजार रूपये दंड, ४५२ प्रमाणे २ वर्ष शिक्षा व २ हजार रूपये दंड व अ.जा.अ.ज.प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन ३ (१) नुसार २ वर्षे शिक्षा व २ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे ॲड. चारूलता बोरसे यांनी काम पाहिले.