अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील सुंदरनगर परिसरात राहणाऱ्या एकाचे बंद घर फोडून घरातून १ लाख रुपयांची रोकड, चांदीचे ब्रेसलेट आणि सोन्याची पोत असा एकूण २ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की उदय हिम्मतराव पाटील वय-४४, रा.सुंदरनगर, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ६ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत बंद घराचे कडी कोयंडा तोडून आज प्रवेश करत घरातून १ लाख रुपयांची रोकड २ हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट आणि १ लाख रुपये किमतीची सोन्याचे पोत असा एकूण २ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकील केला आहे. या संदर्भात उदय पाटील यांनी अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी १० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश गावित करीत आहे.