जळगाव, प्रतिनिधी | आज आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे यांनी प्रभाग क्र. १ चा पाहणी दौरा केला. यावेळी आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपयुक्त दंडवते, देखील सहभागी झाले होते. यात राजमाता नगर, भारत नगर, दुध फेडरेशनचा पाठीमागचा भाग, गेंदालाल मिल व जेथे नागरिकांच्या समस्या होत्या त्या भागांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यात ले आउट मंजूर होऊन देखील गटारीचे काम झाले नसल्याची तसेच काही भागात पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याची तक्रार नागरिकांनी केली. या कामांसाठी आयुक्तानासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले. तसेच खडे प्लॉटधारकांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. त्यांना एनए करून देणे ही आमची जबाबदारी असल्याचे आ. भोळे यांनी सांगितले. काही ठिकाणी अधिकारी व नागरिकांच्या समन्वय नसल्याने प्रश्न निर्माण होत असल्याने हे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक, नागरिक व अधिकारी यांच्यात समन्वय ठेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल असेही आ. भोळे यांनी सांगितले. याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र मराठे, प्रिया जोहरे, सरिता नेरकर, रुखासानाबी गबलू खान, दिलीप पोकळे आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य अधिकारी, डॉ. विकास पाटील, प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी, शहर अभियंता सुनील भोळे, पाणीपुरवठा अभियंता डी. एस. खडके, ,विद्युत विभाग बाबा साळुंखे व कमर्चारी उपस्थित होते.