शेती केल्याच्या रागातून लोखंडी पट्टीने मजुराला मारहाण

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ! भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव शिवारात नफ्याने शेत करण्याच्या कारणावरून एकाला चौघांकडून लाकडी काठ्याने हातापायावर मारहाण करून दुखापत केली तर एकाने लोखंडी पट्टी हातावर मारून जखमी केल्याची घटना 23 मे रोजी सायंकाळी 7 वाजता घडली. याप्रकरणी सोमवार 27 मे रोजी दुपारी 2 वाजता वरणगाव पोलिसात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अभिमान लक्ष्मण इंगळे वय-59, रा. पिंपळगाव ता. भुसावळ असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अभिमान लक्ष्मण इंगळे यांनी विजय कोळी यांचे शेत नफा तत्वावर केलेले आहे या रागातून 23 मे रोजी सायंकाळी 7 वाजता शेताच्या बाजूला राहणारे अशोक रामकृष्ण कोळी, गणेश अशोक कोळी, सागर पुंडलिक कोळी आणि मयूर पुंडलिक कोळी सर्व रा. पिंपळगाव यांनी नफ्याने शेत करत असल्याचा रागातून अभिमान इंगळे यांना शिवीगाळ करत लाकडे दांडक्याने मारहाण केली. तर एकाने लोखंडी त्यांच्या हातावर मारून जखमी केले. जखमी अभिमान इंगळे यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर त्यांनी सोमवारी 27 मे रोजी दुपारी 2 वाजता फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारे अशोक रामकृष्ण कोळी, गणेश अशोक कोळी, सागर पुंडलिक कोळी आणि मयूर पुंडलिक कोळी सर्व रा. पिंपळगाव यांच्या विरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद कंखरे करीत आहे.

Protected Content