गुरांच्या गोठ्याला लागली भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जनावरे बांधण्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे. या आगीत ६ गुरांचा होरपळून मृत्यू झाला असून तीन गुरे गंभीर भाजले गेली. तसेच तीन ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणारे अवजारे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे गुरांच्या गोठ्याला आग लागून ६ गुरांचा आगीत होळपळुन मृत्यू झाला आहे, तर तीन गुरे जखमी देखील झाले आहे यामध्ये शेतकऱ्याचे तीन ट्रॅक्टर व अन्य शेतीला लागणारे अवजारे जळून खाक झाले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीमुळे शेतकरी धनराज प्रजापती यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले अंतुरली दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक नागरिकांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या मदतीने आग पहाटेपर्यंत आटोक्यात आणली मात्र प्रशासनाकडून या शेतकऱ्याला काही मदत मिळेल का ? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Protected Content