Home क्राईम श्रीनगर कॉलनीत बंद घर फोडले अन् सोन्या चांदीचे दागिने लांबविले

श्रीनगर कॉलनीत बंद घर फोडले अन् सोन्या चांदीचे दागिने लांबविले


जळगाव प्रतिनिधी । शहरातील संकल्प श्रीनगर कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ७० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, विद्या काशिनाथ पाटील (वय-४९) रा. श्री नगर कॉलनी शुभंकर अपार्टमेंट ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्या जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील ३० हजार रूपये किंमतीचे दोन तोळे सोन्याची चैन व पॅन्डल, १५ हजाराचे १ तोळ्याचे कानतले, १५ हजार रूपये किंमतीचे सोन्याच्या अंगठ्या, ३०० रूपये किंमतीचे चंदीचे नाणे असा एकुण ७० हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे २० ऑगसट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे करीत आहे. 

 


Protected Content

Play sound