जळगाव प्रतिनिधी । भाजपाचे जेष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार स्व.हरिभाऊ जावळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी स्व.हरिभाऊ यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. याप्रसंगी मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, जिल्हा पदाधिकारी महेश चौधरी, बापू ठाकरे, राजेंद्र मराठे, किशोर चौधरी, मनोज भांडारकर, गणेश माळी, प्रकाश पंडित, मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, केदार देशपांडे, आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, प्रमोद वाणी, शांताराम गावंडे, उमेश सूर्यवंशी, जळगाव जिल्हा ग्रामीणचे मिलिंद चौधरी, मनोज चौधरी, अरुण सपकाळे, स्वप्नील साकळीकर ई.उपस्थित होते.