अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने शहरात निघाली भव्य शोभायात्रा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २२ जानेवारी रोजी यावल येथील शहरात अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्ताने सोहळ्याच्या निमित्ताने समस्त समाज बांधवांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली या पारनेरकर महाराज मंदिरापासून निघालेल्या शोभायात्रेत ढोल ताशे झांज व डिजेच्या सुमधुर संगीताच्या गजरात तरूणाई बेधुन्द होऊन नाचत होती.

या भक्तीमय वातावरणात निघालेल्या या मिरवणुकीत महिला-तरूणी मोठया संख्येतील उपस्थिती ही लक्ष वेधणारी होती, तर शहरातील श्रीराम मंदिर पासुन बुरूज चौक, नगीना मस्जिद, नगीना चौक, महाजन गल्ली परिसरातून ही शोभायात्रा या क्षणाला निघालेली असून, रात्री उशिरा पर्यंत प्रमुख मार्गाने जाऊन या भव्य शोभायात्रेचे समारोप श्री महर्षी व्यास महाराज मंदिराजवळ झाले. शहरात या निमित्ताने ठिकठिकाणी भंडारा व प्रसादाच्या कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

दरम्यान ही भव्य शोभायात्रा शांततेत पार पडावी यासाठी फैजपुर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंह सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विनोदकुमार गोसावी, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान पठान, पोलीस उपनिरिक्षक राजेन्द्र साळुंके व पोलीस कर्मचारी यांच्यासह शहरातील शांतता समिती सदस्य श्रीराम मंदिरचे अध्यक्ष शशांक देशपांडे व मंदिराचे विश्वस्त यांनी महत्वाची भूमिका बजावली .

Protected Content